आमच्या विषयी

प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये गोदावरीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या सोमवार पेठ या ठिकाणी विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट या संस्थेचे भगवान श्री विश्वकर्माचे पुरातन मंदिर आहे. या संस्थेची मुहूर्तमेढ दि. ३ ऑक्टोबर १९३० रोजी घर नं. २३३०, स.नं. ३२०७ बुधवार पेठ, नाशिक येथेच मुळ पंच कै. शंकर विठोबा जाधव, कै. रामचंद्र भाऊराव कदम, त्र्यंबक बापू राजगुरू आणि कै. गणपत नारायण सुर्यवंशी यांनी केली होती. पुढील काळात कै. शंकर रामचंद्र सोनवणे, कै. मुरलीधर सोनूजी नाईक- पिंपरीकर आणि के. सावळीराम बाळाजी दिघे यांच्या प्रयत्नांना यश येऊन दि. ९ जानेवारी १९५३ या शुभदिनी संस्थेची अधिकृत नोंदणी झाली.

आज संस्थेच्या मालकीची,सोमवार पेठ, नाशिक येथे ३१६८ चौ. फुटाची इमारत असुन तळमजल्यावर भगवान श्री विश्वकमांचे मंदिर आहे. २४ बाय ४४ फुटांचे दोन हॉल या वास्तुमध्ये असून सुसज्ज स्वयंपाकघर तळमजल्यावर आहे. तसेच स्वयंपाकाची भांडी, बैठकीसाठी खुर्च्या, सतरंज्या, ध्वनीक्षेपक व्यवस्था इत्यादी सोयी-सुविधा संस्थेकडे उपलब्ध असून समाजबांधव विविध कार्यक्रमांसाठी त्याचा लाभ घेत आहेत. या संस्थेच्या जडणघडणीसाठी अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत व्यक्तींचे मोठे योगदान लाभले आहे. त्यात कै. अ‍ॅड. जनार्दन बंडूजी दिघे, कै. भिकाजी शंकर आहेर-पेठकर, कै. बळवंत दामोदर सातपुरकर, कै. मुरलीधर रामचंद्र दिघे, कै. विनायक मुरलीधर राजगुरू, कै. रामदास शंकर सातपुरकर, कै. गंगाधर तुकाराम गाडेकर, कै. बाबुराव दादाजी शिर्के, कै. गोविंद शंकर सुर्यवंशी, कै. नारायण मुरलीधर कदम, कै. चंद्रभान हरिभाऊ जगताप, कै. बाबुराव धोंडीराम गाडेकर, कै. बाबुराव महादेव राजगुरू, व कै. पंडितराव रामचंद्र सुर्यवंशी, कै. अरुण तुकाराम आहेर या विभूतीचा आवर्जून नामोल्लेख करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

Thumb

संस्थेमार्फत दरवर्षी माघ शु. त्रयोदशी ला मोठ्या प्रमाणात श्री विश्वकर्मा जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. त्यात विविध स्पर्धा आयोजन करण्यात येते. तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ, महिलांकरिता विविध उपक्रम, समाजातील अल्पउत्पन्न असलेल्या समाजबांधवांना २५००/- रू.ची वैद्यकीय मदत दिली जाते. समाजाच्या मागणी नुसार संस्थेमार्फत भव्य राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. संस्थेच्या विद्यार्थी विकास मंच च्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना विविध स्तरावर आपल्या समाजातील दानशूर व्यक्तिमार्फत मदत करण्यात येते.

विश्वस्त मंडळाने मौजे आडगाव सर्वे नं. ३०४/२, प्लॉट नं. १३अ एकुण क्षेत्रफळ १००३.८० चौ. मिटर जागा दिनांक २६/१०/२०२० रोजी खरेदी केली असून इमारतीचा आराखडा महानगर पालिके कडून मंजूर सदर जागेवर २९ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रातील मान्यवर समाजबांधवांच्या उपस्तिथीत करण्यात येऊन सदर कामास सुरुवात झालेली आहे. नियोजित प्रकल्पात सर्व सुविधांनी युक्त असे सभागृह, पार्किंगची सुविधा, अभ्यासिका, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, सामाजिक-सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ, आरोग्य केंद्र तसेच बाहेरगावाहून कामानिमित्त आलेल्या समाजबांधवांसाठी अल्प दरात निवासाची सोय अशा सोयीसुविधांनी युक्त असलेल्या भव्य श्री विश्वकर्मा भवन या वास्तुनिर्मितीचा संकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी समाजबांधवांचे सहकार्य अपेक्षित आहे.

अध्यक्षीय कारकीर्द :

क्र नाव कालावधी
1 कै. अ‍ॅड. जनार्दन बंडुजी दिघे २८/१०/१९७२ ते ०४/१२/१९८२
2 कै. भिकाजी शंकर आहेर ११/०१/१९८३ ते १०/११/१९९५
3 कै. दत्तात्रय नामदेव बागुल ३१/१२/१९९५ ते १२/०७/२०००
4 कै. गंगाधर तुकाराम गाडेकर ६/०८/२००० ते २०/०८/२०११
5 कै. अरूण तुकाराम आहेर २१/०८/२०११ ते ०३/०१/२०११
6 श्री. बाळकृष्ण मुरलीधर दिघे ८/०२/२०१२ ते ०८/०९/२०१३
7 श्री. नारायण राधाकृष्ण शिरसाट ०९/०९/२०१३ ते २२/१०/२०१५
8 श्री. बाळकृष्ण मुरलीधर दिघे २३/१०/२०१४ ते १४/७/२०२२
9 सौ. प्रज्ञा किशोर भालेराव १५/०८/२०२२ ते १८/०८/२०२३

संस्थेच्या मागील दहा वर्षातील प्रगतीदर्शक आढावा

वर्ष सभासद संख्या विश्वस्थ व्यवस्थेचा निधी (सभासद वर्गणी) राखीव फंड व इतर निधी गुंतवणूक बँकेतील शिक्षक
31.03.2014 375 3,18,778.36 1,81,950.17 13,28,582.00 27,204.44
31.03.2015 386 3,32,792.36 1,85,050.17 15,01,696.00 1,08,162.94
31.03.2016 481 4,22,092.36 3,11,444.17 19,38,915.00 54,361.44
31.03.2017 606 5,40,842.36 4,14,184.17 25,03,965.00 38,771.94
31.03.2018 629 5,61,742.36 5,88,761.17 28,39,710.00 53,388.00
31.03.2019 660 5,91,192.36 18,00,0,71.67 37,31,171.50 4,25,031.94
31.03.2020 694 6,23,492.36 33,20,288.97 53,91,652.00 2,98,942.44
31.03.2021 718 6,46,292.00 47,22,500.00 67,81,349.00 2,97,957.44
31.03.2022 748 6,74,792.00 53,67,208.00 77,15,389.00 32,567.30
31.03.2023 776 7,01,392.00 62,31,890.00 83,33,759.00 2,56,604.30

सभासदांना व समाजबांधवांना विनंती

  1. संस्थेस सढळ हाताने देणगी देऊन बहु उद्देशीय प्रकल्पाच्या प्रगतीस सहाय्य करा
  2. संस्थेच्या कार्यालयात तसेच अधिकृत संकेतस्थळावर वाग्दत्त वधू वरांची नोंदणी करावी.
  3. समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत करा.
  4. वैद्यकीय मदतीसाठी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाज बांधवाची माहिती संस्थेस कळवा
  5. संस्थेचे सोमवार पेठ येथील विश्वकर्मा मंदिर कार्यालय सकाळी ८ ते १२ व सायं. ४ ते ८ या वेळेत खुले असेल. आपण आवश्य भेट द्यावी.

संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात राबविण्यात येणारे धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम

  1. श्री. विश्वकर्मा जयंती उत्सव (माघ शुद्ध त्रयोदशी)
  2. विद्याथ्यांच्या विविध स्पर्धा, मार्गशदन शिबीरे आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा.
  3. समाजातील उपवर मुला-मुलींसाठी राज्य स्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा.
  4. संत भोजलींग काका पुण्यतिथी (श्रावण वद्य नवमी)
  5. संत जळोजी मळोजी महाराज पुण्यतिथी (पौष वद्य नवमी).
  6. महिला मेळावा व हळदी कुंकू
  7. या सोबतच विविध प्रासंगीक कार्यक्रम आयोजीत केले जातात. या सर्व कार्यक्रमामध्ये समाजातील सर्व स्तरातील बंधु-भगिनी सहभागी होतात.

मान्यवरांच्या बोलक्या प्रतिक्रिया