१) यापूढे वधु वर असा उल्लेख जेथे जेथे येईल त्याचा अर्थ वधु उमेदवार आणि वर उमेदवार असा असेल.
२) वधु वर नोंदणी दि. १५ सप्टेंबर २०२४ ते १० डिसेंबर २०२४या कालावधी मध्ये ऑनलाईन व ऑफलाईन सुरु असेल.
३) नोंदणी करतांना वधुचे वय १८ वर्ष व वराचे वय २१ वर्ष असणे आवश्यक आहे, त्यापेक्षा कमी असल्यास नोंदणी घेतली जाणार नाही.
४) ऑनलाईन नोंदणीसाठी विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या vishwakarmavikas.com या अधिकृत वेबसाईट वर रेशिमगाठ नोंदणी या लिंक वर जाऊन नोंदणी करता येईल.
५) ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणे शक्य नाही त्यांनी ऑफलाईन नोंदणीसाठी विश्वकर्मा मंदिर, सोमवार पेठ, नाशिक येथे दि. १५ सप्टेंबर २०२४ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते १ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत प्रत्यक्ष येऊन नोंदणी करावी किंवा विश्वस्त मंडळातील सदस्यांशी मोबाईल वर संपर्क साधावा.
६) वधु वर नोंदणी शुल्क प्रत्येक उमेदवारासाठी रु. ५००/-- असेल व वधू वर पुस्तिका पोस्टाने हवी असल्यास आधिक रु. १००/-- द्यावे लागतील.
७) नोंदणीकृत वधु वर व त्यांचे पालक यांनी २५ डिसेंबर २४ रोजी सकाळी ९.३० वाजता नियोजित कार्यक्रम स्थळी हजर रहावे. मेळाव्याचे ठिकाण नोंदणी केलेल्या उमेदवारांना मेळाव्याच्या १० दिवस अगोदर कळविले जाईल.
८) नोंदणी केलेले वधु वर व त्यांचे २ पालक यांनाच फक्त मेळाव्याच्या ठिकाणी परिचय कक्षात प्रवेश दिला जाईल तसेच त्यांच्या दुपारच्या जेवणाचे कुपन हि दिले जाईल.
९) कार्यक्रम स्थळी प्रथम उपस्थित झालेल्या दहा वधु वरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन वधु वर पालक परिचय मेळाव्याची सुरुवात केली जाईल.
१०) वधु वर पालक परिचय मेळावा २०२४ ची पुस्तिका दि. २५ डिसेंबर २०२४रोजी सायंकाळी चार वाजता मेळाव्यात प्रकाशित केली जाईल व त्वरीत वितरित केली जाईल त्यासाठी नोंदणीची पावती (ऑनलाईन/ ऑफलाईन) सादर करावी लागेल.
११) नोंदणी केलेल्या वघु वरांना प्रत्यक्ष न आणता फक्त पालक उपस्थित असतील तर त्यांना परिचय देण्यासाठी व्यासपिठावर जाता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१२) वधु वर परिचय निर्धारित वेळेतच सुरु होईल म्हणुन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी वेळेवर उपस्थित होणे आवश्यक आहे.
१३) वधु वर परिचयासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणुन कार्यक्रमात भाषणे व सत्कार होणार नाहीत, फक्त कार्यकर्त्यांनी केलेल्या अनमोल मदतीची योग्य ती दखल घेणारा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मेळाव्याच्या शेवटच्या सत्रात संपन्न होईल.
१४) विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या vishwakarmavikas.com या अधिकृत वेबसाईट वर दि. १ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजेनंतर रेशिमगाठ नोंदणी या लिंक वर जाऊन नोंदणी केलेल्या सर्व वधु वरांचा तपशिल त्यांना ऑनलाईन ३१ ऑगस्ट २४ पर्यंत बघता येईल. त्यासाठी युजर आयडी म्हणून नोंदणी फॉर्म वर आपण दिलेला मोबाईल नंबर पासवर्ड वापरावा.
१५) १० डिसेंबर २०२४ नंतर म्हणजे ११ डिसेंबर २०२४ते ३१ ऑगष्ट २०२४ या कालावधीत जे वर वधू ऑनलाईन नोंदणी करतील त्यांच्यासाठी नोंदणी फी व नोंदणीचे वय वगैरे सर्व नियम वरीलप्रमाणे असतील. त्यांना संस्थेच्या वेबसाईट वर नोंदणी झालेल्या सर्व वधु वरांचे अद्ययावत तपशिल ऑनलाईन ३१ ऑगष्ट २०२४ पर्यंत बघता येतील, फक्त त्यांना वधु वर पुस्तिका मिळणार नाही, तसेच २५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या वधु वर पालक परिचय मेळाव्यासाठी १ सप्टेंबर २०२४ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत नवीन नोंदणी करणे आवश्यक असेल.
१६) ११ डिसेंबर २०२४ ते ३१ ऑगष्ट २०२४ या कालावधीत जमा झालली नोंदणी फी ची रक्कम संस्थेच्या बहुउद्देशीय इमारत निधी देणगी कडे वर्ग केली जाईल.
१७) दि. २५ डिसेंबर २०२४रोजी प्रकाशित झालेल्या वधु वर पुस्तिकेचे तसेच संस्थेच्या अधिकृत वेबसाईट वरील नोंदणी केलेल्या वधु वरांचे तपशिल कोणीही WhatsApp वर अथवा कोणत्याही Public Domain वर अपलोड करु नये, तसे केल्यास संबंधित व्यक्तीवर संस्था कायदेशिर कारवाई करील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना ती व्यक्ती स्वत: जबाबदार असेल.